13. खऱ्या धम्माची खोट्या धम्मासोबत सरमिसळ करू नका
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
*************************
13. खऱ्या धम्माची खोट्या धम्मासोबत सरमिसळ करू नका
Mix not true Dhamma with false Dhamma
==================
1) जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यत पोहचू शकत नाहीत.
2) जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बद्धीमुळे कधीही सत्यापर्यत पोहचू शकत नाहीत.
3) जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात, ज्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते.
4) घर नीट शाकारलेले नसेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते; त्याप्रमाणेच असंस्कृत मनात (ill-trained mind) तृष्णा (craving) प्रवेश करते.
5) घर नीट शाकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरु शकत नाही, त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात (well-trained mind) तृष्णा प्रवेश करु शकत नाही.
6) उठा! प्रमादी व निष्काळजीपणाने राहू नका. उत्तम शिकवणूकीप्रमाणे वागत रहा. जो त्याप्रमाणे वागतो तो या जगात आणि इतर सर्व जगात सुखी होतो.
7) सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करु नका. सन्मार्गाने जाणारे लोक या जगात आणि इतर सर्व जगात सुखी होतात.
**********************
खंड चवथा, भाग तिसरा समाप्त
**********************
Comments
Post a Comment