1. सुखी गृहस्थ

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
एक- गृहस्थांसाठी प्रवचने
SECTION ONE-- Sermons for Householders
*************************
1. सुखी गृहस्थ
The Happy Householder
*************************

1) एकदा अनाथपिंडक तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करुन जवळच्या आसनावर बसला.

2) गृहस्थांचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती.

3) म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची तथागतांना विनंती केली.

4) तथागत म्हणाले, "गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे (happiness of possesion). गृहस्थाजवळ धन असते. त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते."

5) "दुसरे सुख उपभोगाचे (happiness of enjoyment). गृहस्थाजवळ धन असते. ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करतो, न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते."

6) "तिसरे सुख म्हणजे अन्-ऋण (happiness of freedom from debt). गृहस्थ कोणाचेही लहानमोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेही काही ऋण लागत नाही, ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो."

7) "चौथे सुख निर्दोषतेचे. काया, वाचा, मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो."

8). "अनाथपिंडक, जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म