1. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
*************************
तीन- अहिंसा
Section II- Ahimsa
*************************
1. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण
The different ways in which it was interpreted and followed
**********************

1) अहिंसा म्हणजे 'जीवहिंसा न करणे,' हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

2) करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.

3) तथापि, असा एक प्रश्न विचारला जातो की, बुद्धप्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होती?

4) जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की, सर्वकाळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत् चे असत् ला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते.

5) ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे.

6) बौद्ध राष्ट्रातील लोकांनी अहिंसेचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे?

7) हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे.

8) श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमकांविरूध्द स्वतः लढले आणि लोकांनाही त्यांनी लढण्यास प्रवृत्त केले होते.

9) तर दुसरीकडे ब्रम्हदेश (म्यानमार) येथील भिक्खू स्वतः विदेशी आक्रमकांविरूद्ध लढले नाहीत आणि त्यांनी लोकांनाही लढण्यापासून परावृत्त केले.

10) ब्रम्हदेशाचे लोक अंडे खातात पण मासे खात नाहीत.

11) अशा रीतीने दोन भिन्न देशांत अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते.

12) अलीकडे जर्मन बौद्ध भिक्खू मंडळाने एका ठरावाने पंचशीलेतील अहिंसा सोडून चार शीले मान्य केली आहेत.

13) अहिंसेच्या सिद्धान्ताबाबत अशी वस्तुस्थिती आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म