1. माणसाची अधोगती कशाने होते
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
दोन- शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने
SECTION TWO-- Sermons on the Need for Maintaining Character
*************************
1. माणसाची अधोगती कशाने होते
What Constitutes the Downfall of Man

1) एकदा तथागत श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या विहारात राहात होते.
2) त्या वेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत कोणी एक देव तथागतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करुन बाजुला उभे राहिला. आणि असे उभे राहून त्याने पुढील गाथेद्वारे तथागतांना विचारले:
3) "गौतमा! मी तुम्हाला अधःपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे, कृपा करुन अधःपतनाची कारणे काय असतात ते मला सांगा!" तथागतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले:
4) "कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धम्मप्रेमी हा उन्नतपथावर तर धम्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरु आहे."
5) "अधोगतीच्या वाटसरुला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सदगुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय."
6) "झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता हे सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय."
7) "आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषन न करणे हे अधःपतनाचे चौथे कारण होय."
8). "श्रमण, ब्राह्मण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय."
9) "जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही ह्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधःपतनाचे सहावे कारण होय."
10) "आपले कूळ, संपत्ती, वंश यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधःपतनाचे सातवे कारण होय."
11) "व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधःपतनाचे आठवे कारण होय."
12) "स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता गणिका आणि परस्त्रिया यांच्यासोबत असणे, हे अधःपाताचे नववे कारण होय."
13) "असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधःपतनाचे अकरावे कारण होय."
14) "जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्त्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधःपतनाचे बारावे कारण होय."
15) "ही सर्व अधःपतनाची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळविल्यास, देवा, तरच तू वाचशील."

Comments
Post a Comment