2. पुत्रापेक्षा कन्या बरी

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
एक- गृहस्थांसाठी प्रवचने
SECTION ONE-- Sermons for Householders
*************************
2. पुत्रापेक्षा कन्या बरी
*************************
1) एकदा तथागत श्रावस्ती येथे राहत असता कोसलराजा पसेनदी त्यांना भेटण्यासाठी आला.

2) राजा तथागतांशी चर्चा करीत असताना राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले.

3) ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. तथागतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले.

4) राजाने सांगितले की, राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे.

5) यावर परिस्थिती ओळखून तथागत म्हणाले: "राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सदगुणी कन्या, पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे."

6) "तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करील. मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म