2. दुष्ट मनुष्य
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
दोन- शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने
SECTION TWO-- Sermons on the Need for Maintaining Character
*************************
2. दुष्ट मनुष्य
*************************
1) एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले.
2) "भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हाला माहीत आहे काय?" भिक्खूंनी 'नाही' म्हणताच तथागत बोलले:
3) "तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो."
4) "दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवतो. आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायला नको, तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो."
5) "ज्या मनुष्याला विचारले असता दुसऱ्याचे सदगुण दाखवीत नाही. पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो."
6) "तो विचारले असतानाही आपले दोष उघड करत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो. परंतु त्याचा तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट होय."
7) "भिक्खू हो, असा मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या स्वतःच्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यानंतर तर सांगायलाच नको, तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करीत असतो; भिक्खूंनो असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा."
Comments
Post a Comment