2. ब्रम्ह सहंपती सुवार्ता जाहीर करतो
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
(Campaign of Conversion)
*************************
भाग पहिला- बुद्ध आणि त्यांचा विषादयोग
Buddha and His Vishad Yoga
*************************
2. ब्रम्ह सहंपती सुवार्ता जाहीर करतो
Proclamation of good news by Bramha Sahampati

1) बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रम्ह सहंपतीला अतिशय आनंद झाला. त्याने बुद्धांना वंदन केले. त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला.
2) परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की, "ही आनंददायी वार्ता ऐकून हर्षित व्हा, उल्हसित व्हा, आनंद व्यक्त करा. जगातील सर्व वाईट गोष्टींचे व दुःखाचे मूळ बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे."
3) "दुःखी-कष्टी जीवांना बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे ह्रदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलूमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील."
4) "जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या खुषखबरीमुळे आंनदित व्हा."
5) "जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो आता पोटभर खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृषार्तांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करुन घ्या. निरुत्साही जनहो, आता हर्षभरित व्हा."
6) "बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की, जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपलेसे करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधःपतित आहेत त्यांना आपला उद्धार करुन घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाशझोत मिळतो."
7) "बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे. आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे." (His doctrine is the doctrine of righteousness and his aim is to establish the kingdom of righteousness on earth.)
8) "त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे."
9) "धन्य आहेत बुद्ध की, त्यांचा मार्ग बुद्धीवादी मार्ग आहे (path of reason). आणि तो भोळसटपणातून, अंधश्रद्धेतून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत बुद्ध की, जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत बुद्ध की जे सदाचाराचे नियम शिकवितात. धन्य आहेत बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात (love, kindness and fellowship), ज्यामुळे मनुष्य आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास मदत करु शकतो."

*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. धम्मदीक्षेचे दोन प्रकार
*********************
Comments
Post a Comment