2. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग पहिला - त्यांचे व्यक्तीमत्त्व
Part I- His Personality
*************************
2. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष
The Testimony of Eye-witnesses

1. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत ह्या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात.
2. साल नावाच्या एका ब्राम्हणाची अशी साक्ष काढता येईल की, भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या:
3. भगवंतांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राम्हण बसला. त्यावेळी महापुरुषाची बत्तीस लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही.
4. ही बत्तीस लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबाबत त्याला संदेह वाटला; पण त्याला स्मरले की, वृद्ध ब्राम्हण किंवा आचार्यांचे प्राचार्य ह्यांच्या मते जे अर्हत व सम्यक-संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दांनी त्याने त्यांची स्तुती करण्याचे ठरवले.
5. "तथागत आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत. महापुरुषाच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण ह्या सुविकसित देहात प्रतीत होत आहे."
6. "स्पष्ट दृष्टी, सुंदर, उंच सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायांत सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी, सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवीत आहात?"
7. "आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता सातासमुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजेत. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्ते म्हणून आपण असायला पाहिजे."
8. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेज:पुंज होती की, *त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे.*
9. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना *'देखणा मुलगा'* असे म्हटले, त्यात नवल ते कसले?

Comments
Post a Comment