2. भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण



भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग दुसरा- भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते
Part II- Different Views of the Buddha's Dhamma
*************************
2. भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण
The Buddha's Own Classification
*************************

1) भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे.

2) पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. (Dhamma)

3) त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला 'जो धम्म नाही तो- अधम्म' असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. (Not- Dhamma)

4) त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. (Saddhamma)

5) हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय.

6) भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी *धम्म, अधम्म आणि सद्धम्म* ह्या तीनही वर्गांना समजून घेतले पाहिजे.

*************************
तिसरा खंड- भाग दुसरा समाप्त
*************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म