3. बुद्धांनी काय स्वीकारले

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~ लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग सातवा- साम्य आणि भेद
Comparison and Contrast
*********************
3. बुद्धांनी काय स्वीकारले
What HE Accepted
*************************

1) बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य (the first distinguishing feature) असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू "मन" आहे हे त्यांनी सांगितले.

2) मन सर्व वस्तूंच्या अग्रभावी असते (सर्व वस्तूंत श्रेष्ठ आहे), ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले कि सर्व वस्तूंचे आकलन होते.

3) मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते.

4) ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार (culture of the mind).

5) बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरुन ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे.

6) जे जे वाईट आहे, वाईटाशी संबधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातून उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते.

7) ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुध्दी हे धर्माचे सार होय. (The cleaning of the mind is, therefore, the essence of religion).

8) बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय. (the avoidance of all sinful acts)

9) त्यांच्या शिकवणीचे चवथे वैशिष्ट्य असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्त्वांचे पालन करण्यात आहे. (the observance of the tenets of the religion)

10) बुद्धांचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय?


*****************************
प्रथम खंड- (भाग १ ते भाग ७)- समाप्त

*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
भाग पहिला- बुद्ध आणि त्यांचा विषादयोग

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म