3. बुद्धांच्या स्वदेशप्रत्यागमनासाठी प्रार्थना

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
समारोप (उपसंहार)
Epilogue
*************************
3. बुद्धांच्या स्वदेशप्रत्यागमनासाठी प्रार्थना
A prayer for His Return to His Native Land
*************************

1. "हे बुद्धा! मी मनापासून निष्ठा ठेवत आहे त्या तथागतावर,
ज्याचा प्रकाश आहे व्याप्त
अनिर्बंध दशदिशांत
आणि माझी निग्रही मनीषा
तुझ्या भूमीत जन्म घेण्याची!

2. मन:चक्षूंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन,
तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत
तिची श्रेष्ठता मी जाणत आहे.

3. आकाशासमान सर्वसमावेशक ती भूमी, अनन्त आणि असीम.
(That it is like sky, embracing all,
Vast and spacious without boundaries.)

4. सन्मार्गानुसारी तुझी करुणा व मैत्री (mercy and compassion in accordance with the righteous way),
तू संपादित केलेल्या सर्व भौतिक कुशल कर्मांचा परिपाक (outgrowth of stock of merit accumulated by you),
जो सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे.

5. आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी,
जणू चंद्र-सूर्याचे आरसे, रुपदर्पण.

6. माझी अशी प्रार्थना:
तिथे जन्म घेतलेले सर्व प्राणीमात्र
तुझ्याप्रमाणेच सत्याचा जयघोष करोत,
हे बुद्धा!
Let me pray that all beings, having been born there,
Shall proclaim the Truth, like Buddha Thyself.

7. मी लिहित आहे आहे इथे लेख हा,
आणि गात आहे या गाथा,
तुझे व्हावे साक्षात दर्शन,
हीच आहे माझी प्रार्थना.

8. अखिल प्राणिमांत्रासहित
ह्या धन्य-भूमीत
होवो मला जन्म प्राप्त!

*'एनसायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स्'*
खंड 10. पृष्ठ 169

☘☘☘☘☘☘☘☘
🙏 *समाप्त* 🙏
☘☘☘☘☘☘☘☘

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म