3. सर्वोत्तम मनुष्य

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
दोन- शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने
SECTION TWO-- Sermons on the Need for Maintaining Character
*************************
3. सर्वोत्तम मनुष्य
The Best Man
*************************

1) एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले.

2) भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, "जगात चार प्रकारची माणसे आढळतात."

3) "पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही, दुसऱ्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो, तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतो."

4) "जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य चितेवरील मशालीसारखा आहे, जी दोन्हीही बाजूला पेटलेली असते आणि मध्ये शेणाने माखलेली. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगात येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःला ही निरुपयोगी आहे."

5) "जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करुन दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून आधिक चांगला मनुष्य होय."

6) "आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम मनुष्य समजावा."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म