3. मुलांसाठी विनय
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
3. मुलांसाठी विनय
Vinaya for Children
*************************
1) मुलांनी आई वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या आईवडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलांवर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्यांना परावृत्त करतात. सद्गुणाचा त्यांना उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सर्व मालमत्ता त्याच्यावर सोपवतात.
Comments
Post a Comment