4. नीती आणि धर्म (Religion)

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग पहिला- बुद्धांचे त्यांच्या धम्मात स्थान
Part I- His Place in His Dhamma
*************************
4. नीती आणि धर्म (Religion)
Morality and Religion
*************************

1) नीतीचे धर्मात स्थान कोणते?

2) खरे तर धर्मात नीतीला स्थान नाही.

3) *धर्माचे विषय म्हणजे ईश्वर, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ/बळी हे होत.*

4) एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो.

5) 'शान्ती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची एक बाब' या कारणासाठी केवळ धर्मात नीतीचा समावेश होतो.

6) धर्म हा एक त्रिकोण आहे.

7) आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा; कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात.

8). ही धर्माची विचारसरणी आहे.

9) प्रत्येक धर्म नीती शिकवितो. *परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे.*

10) *ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडला जातो किंवा त्यापासून सोडविला जातो.*

11) धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे.

12) *म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही.*

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म