4. ज्ञानी मनुष्य
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
दोन- शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने
SECTION TWO-- Sermons on the Need for Maintaining Character
*************************
4. ज्ञानी मनुष्य
The Enlightened Man

1) तथागत एकदा उकट्ठ आणि सेतब्ब ह्या दोन नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी तिथे द्रोण नावाचा एक ब्राम्हणही या राजरस्त्यावर आला.
2) त्याच वेळी तथागतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी आसन घालून ते बसले. तथागतांच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या द्रोण ब्राम्हणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत व संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या तथागतांचे दर्शन झाले. तथागतांजवळ जाऊन तो म्हणाला:
3) "आदरणीय महोदय! आपण देव तर नाही?"
"नाही, ब्राम्हणा, मी खरोखर देव नाही."
"आपण गंधर्व तर नव्हेत?"
"नाही! ब्राम्हणा, मी खरोखर गंधर्व नाही."
"मग आपण यक्ष तर नव्हेत?"
"नाही! ब्राम्हणा, मी खरोखर यक्ष नव्हे."
"तर मग आपण मनुष्य नाही काय?"
"नाही. ब्राम्हणा मी मनुष्यही नाही."
4) तथागतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो द्रोण ब्राम्हण म्हणाला, "तुम्हाला मी देव आहे का, गंधर्व आहे का, यक्ष आहे का किंवा मनुष्य आहे का असे विचारले असता आपण नाही म्हणता. तर मग आदरणीय महोदय आपण आहात तरी कोण?"
5) "ब्राम्हणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निरास केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. ("Verily I was a Deva, a Gandhabba, Yakkha, a man, so long as I had not purged myself of the intoxicants.") पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे. आणि मुळाचे विच्छेदन करुन बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे."
6) "ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही. त्याप्रमाणे हे ब्राम्हणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पर्श असा राहिलो आहे."
7) "म्हणून हे ब्राम्हणा, तू मला एक बुद्ध (ज्ञानी पुरुष) असे समज."
"Consider me as the Enlightened One."

Comments
Post a Comment