5. न्यायी आणि सज्जन मनुष्य
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
दोन- शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने
SECTION TWO-- Sermons on the Need for Maintaining Character
*************************
5. न्यायी आणि सज्जन मनुष्य
Man- Just and Good

1.
भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, "माणसे चार प्रकारची असतात. जर
तुम्हाला सज्जन आणि न्यायी मनुष्य ओळखायचा असेल तर या चार प्रकारातला फरक
तुम्ही जाणला पाहिजे."
2. "भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात; परंतु पर-कल्याणाचा विचारही करीत नाहीत."
3. "अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषयवासनेचे (lust) निर्मुलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषयवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे, द्वेष व वैमनस्य (ill-will) निर्मुलन करतात; परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा, द्वेषाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे (ignorance) निर्मुलन करतात; परंतु ते दुसर्यांना त्यांच्या अविद्येचे निर्मुलन करण्यासंबंधाने आग्रहाने सांगत नाहीत."
4. "असा माणूस स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो; परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही."
5. "दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात. स्वहितासाठी झटत नाहीत."
6. "अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, द्वेष आणि अविद्या (lust, ill-will, and ignorance) यांच्या निर्मुलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात."
7. "भिक्खूहो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही."
8. "भिक्खूहो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात."
9. "असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषयवासना, क्रोध, द्वेष आणि अविद्या यांचे निर्मुलन करीत नाही; त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही."
10. "हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही."
11. "भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात."
12. "अशी माणसे स्वतःमधील विषयभावना, क्रोध, द्वेष आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषयवासना, क्रोध, द्वेष आणि अविद्या यांच्या निर्मुलनासंबंधी आग्रहाने सांगतात."
13. "अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे."

Comments
Post a Comment