5. केनियाने केलेले स्वागत

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग चवथा- बुद्धांचे मित्र आणि प्रशंसक चाहते
Part IV- Friends and Admirers
*************************
5. केनियाने केलेले स्वागत
Keniya's Welcome
*************************

1) आप्पण येथे सेल नावाचा एक ब्राम्हण राहत होता. तो तीन वेदांत पारंगत होता. तसेच व्याख्यासंहित कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र व व्युत्पतिशास्त्राचा तज्ज्ञ व पाचवी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता. तो व्याकरण जाणत असे. कूटतर्कशास्र तसेच महापुरुषाची लक्षणे ओळखणे यांतही तज्ज्ञ होता. त्याच्याकडे तीनशे तरुण ब्राह्मण होते ज्यांना तो वेदमंत्र शिकवत असे.

2) केनिय नावाचा अग्निपूजक ब्राम्हण हा सेलचा अनुयायी होता. आपल्या तीनशे शिष्यांसह सेल त्याच्याकडे गेला त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते व स्वतः केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता.

3) ते पाहताच ब्राम्हण केनियाला म्हणाला, "हे सर्व काय चालले आहे? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगधनरेश बिंबिसार सपरिवार उद्या भोजनास येणार आहेत की काय?"

4) "सेल! ही विवाहभोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही नाही. पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत बाराशे पन्नास भिक्खुसह आप्पण येथे आले आहेत."

5) "श्रमण गौतमांच्या बाबतीत अशी किर्ती प्रस्रूत आहे की, ते सम्यक संबुद्ध आहेत."*

6) "त्यांनाच भिक्खुसंघासह मी उद्या भोजनास निमंत्रित केले आहे. ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे, ती त्यांच्यासाठीच आहे."

7) सेल म्हणाला, "केनिय, तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस काय?"
"होय."
"केनिय, तू खरोखरच असे म्हणालास?"
"होय, मी तसे म्हणालो."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म