6. राजा प्रसेनजितने केलेली बुद्धांची स्तुती

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग चवथा- बुद्धांचे मित्र आणि प्रशंसक चाहते
Part IV- Friends and Admirers
*************************
6. राजा प्रसेनजितने केलेली बुद्धांची स्तुती
Pasendi In Praise of the Master
------------------------------

1) एकदा तथागत बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत होते.

2) त्यावेळी कोशल नरेश प्रसेनजित एका युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करुन परतला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यानंतर तो तिथे वळला. जिथपर्यत रथ जाऊ शकत होता तिथपर्यत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायी चालत उद्यानात गेला.

3) त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते. कोशल-नरेश प्रसेनजित त्या भिक्खूंकडे गेला आणि म्हणाला, "भंते, ह्या समयी अर्हत सम्यक संबुद्ध तथागत बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो."

4) "महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. व्हरांड्यात प्रवेश करा. खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील."

5) त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला. खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले.

6) मग प्रसेनजितने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने शिरसाष्टांग वंदन केले. त्यांच्या पदकमलाचे चुंबन घेतले व हाताने स्पर्श केला आणि आपल्या आगमनाची सूचना दिली, "तथागत, मी कोसल-नरेश प्रसेनजित आलो आहे."

7) तथागत बुद्धांनी विचारले, "पण महाराज, माझ्यात असे काय वैशिष्ट्य आहे की, आपण इतके आदर-सन्मान व आपुलकीने वागत असता?"

*************************
सहावा खंड समाप्त
*************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म