7. पवित्र जीवन म्हणजे काय?

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
V (पाच)- बुद्धांची धम्मावरील प्रवचने
SECTION FIVE-- Sermons on Dhamma
*************************
7. पवित्र जीवन म्हणजे काय?
What is Holy Life?
*************************

1) एकदा चारीका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले:

2) "भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी, किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नांतून सुटका करून घेण्यासाठी, किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खूहो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यांपासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते." 

 

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म