8. कन्येसाठी विनय
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
8. कन्येसाठी विनय
Vinaya for Daughter
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
8. कन्येसाठी विनय
Vinaya for Daughter
*************************
1) एकदा तथागत भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते. तेथे मेंडकाचा नातू उग्गह याने त्यांना भेट दिली. अभिवादन करुन तो त्यांच्या बाजुला बसला आणि तथागतांना म्हणाला,
2) "तथागत, उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे."
3) बुद्धांनी त्याला मूक संमती दिली.
4) तथागतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्थानावरुन उठला व त्यांना अभिवादन करुन तो त्यांच्या उजव्या बाजुने निघून गेला.
5) रात्र संपल्यावर तथागतांनी चीवर परिधान केले आणि भिक्षापात्र व चीवर घेऊन ते उग्गहाच्या घरी आले. तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उग्गहाने स्वतःच्या हाताने तथागतांचे समाधान होईपर्यंत त्यांना अन्न वाढले.
6) तथागतांनी भिक्षापात्रावरुन आपला हात काढून घेतल्यावर उग्गह त्यांच्या बाजुला बसला आणि म्हणाला,
7) "तथागत, या माझ्या मुली. त्या आता पतीगृही जाणार आहेत. तथागतांनी त्यांना चांगला सल्ला द्यावा. आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा."
8). यावर तथागत त्या मुलींना उद्देशून म्हणाले, "तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की, आमचे आई बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील, त्या पतीविषयी प्रेमबुद्धी ठेवू, आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू. मनःपुर्वक काम करु. कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडीगुलाबीने करायला लावू. नेहमी गोड आवाजात बोलू. असे वागायला शिका."
9) "त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आप्तेष्ट,आईवडील, संन्याशी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ, त्यांचा आदर करु. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सन्मान करु. असे वागायला शिका."
10) "त्याप्रमाणेच पतीगृहीची सर्व कलाकुसर व इतर कामे, मग ती लोकर किंवा कापूस विणण्याची असोत किंवा इतर, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करु. कोणत्याही कामाचे स्वरुप नीट समजावून घेऊ. म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल, असे वागायला शिका."
11) "त्याप्रमाणेच दूत, कामगार हे आपली कामे कशी बजावतात, प्रत्येक जण काय करतो आणि काय करीत नाही ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ, असे वागायला शिका."
12) "त्याप्रमाणेच आपला पती जे धनधान्य, रुपे, सोने कमाई करुन घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू, त्यांच्यावर पहारा आणि देखरेख ठेवू, आणि जेणेकरुन चोर दरोडेखोर यांच्या नजरेपासून ते सुरक्षित राहील असे सर्व काही करु, असे वागायला शिका."
13) हा उपदेश ऐकताच उग्गहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या. त्यांनी कृतज्ञतेने तथागतांना धन्यवाद दिले.

Comments
Post a Comment